bebpfxsieaajb1v

यशस्वी लोकांचे ३ अंगीभूत गुण!

मित्रानो,

काही दिवसांपूर्वी मी एक खूप छान विडिओ बघितला. ह्या व्यक्तीने जगातल्या कित्येक करोडपती, अब्जाधीश लोकांबरोबर काम केले आहे. त्या अनुभवावरून ह्या विडिओ मध्ये यशस्वी व्यक्ती मध्ये असणाऱ्या ३ महत्वाच्या गुणांची माहिती दिली आहे. आपल्या करिता मी हि माहिती भाषांतरित करीत आहे! तेव्हा मित्रानो तुम्हीच तपासा, काय तुमच्या मध्ये हे गुण आहेत :

 

१) कार्यान्वन करण्याचा वेग (स्पीड ऑफ इम्पलेमेंटेशन):

speed-of-implimentation

माझा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर माझ्या लक्ष्यात आले आहे कि यशस्वी लोक इतक्या वेगाने माहिती आत्मसात करतात आणि तितक्याच वेगात त्याचे कार्यान्वन करतात कि जसा काही उद्याचा दिवस उगवणारच नाहीये !

उदाहरणच सांगायचं झाल तर मी एकदा माझ्या एका अब्जाधीश ग्राहक बरोबर ‘Skype’  कॉल वर होतो. मी त्यांना डिजिटल मार्केटिंग वर काही मार्गदर्शन करत होतो कारण ती माझी एरिया ऑफ एक्सपेर्टीसे आहे. त्यांना फेसबुक मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नव्हती, त्यावेळी मी त्यांना सांगितलं तू तुम्ही कशा प्रकारे ट्विट्स करू शकता ज्यामुळे तुमचे कॅम्पेन (campaign) जास्त यशस्वी होऊ शकेल. कॉल संपत नाही तेवढ्यात माझ्या लक्षात आलं कि माझ्या skype वर काहीतरी message  आला आहे. मेसेज होता ‘तू जे सांगत होतास ते मी करून टाकल आहे, पुढे काय करायचं ते सांग !’ मित्रानो लक्षात घ्या फक्त १५ सेकंड्स मध्ये त्यांनी हे सर्व केले होते! अविश्वसनीय ! नाही का?

मित्रानो ! आणि हाच पॅटर्न तुम्ही यशस्वी लोकं मध्ये बघू शकाल. जसे ते जर एखादे पुस्तक वाचतील तर लगेच आपल्या आयुष्यात कार्यानवीत (इम्पलिमेन्ट) करतील. ते कधीच उद्या साठी थांबत नाहीत. ते जणूकाही लगेच आत्मसात करतात आणि लगेच इम्पलिमेन्ट करतात.

त्यामुळे मित्रानो , मला देखील हि quality माझा आयुष्यात आणायला नक्कीच आवडेल. त्यामुळे आजकाल जर मला एखादी गोष्ट आवडली तर मी लगेच ती गोष्ट आत्मसात करून इम्पलिमेन्ट करायला तुटून पडतो !

मला आठवतंय , जेव्हा मला माझे पहिले गुरु (मेंटॉर) भेटले तेव्हा ते हे बघत होते कि माझ्या मध्ये शिकण्याची किती भूक आहे. त्यावेळी त्यांनी फोन वर बोलताना ते कुठे राहतात ह्याची थोडी हिंट दिली. त्यामुळे जसा आमचं बोलणं संपल, १५ मिनिटात मी त्यांच्या इथे जाणाऱ्या flight चे तिकीट बुक केले होते. मी  त्यांना मेसेज केला कि मी तुमच्या इथे येण्यासाठी तिकीट बुक केल आहे सांगा कस भेटायचं. त्यामुळेच त्यांनी मला शिकवण्याचे मान्य केल. कारण त्यांना मी हे प्रात्यक्षिक दाखवल होत कि मी त्यांच्याकडून शिकायला किती उत्सुक आहे!.

त्यामुळे मित्रानो, मी तुम्हाला सांगेन कि तुम्ही तुमचा ‘स्पीड ऑफ इम्पलेमेंटेशन’ वाढवा ! कारण तुम्ही जेवढ्या वेगाने हे करू लागाल तुम्हाला ह्याचे परिणाम तितक्याच लवकर बघायला मिळतील. So Let’s do it!

 

२) अनिश्चिततेमध्ये असताना निर्णय घेण्याची क्षमता (ऍबिलिटी तो टेक ऍक्शन व्हेन यु  फील उन्सेर्टिन):

action

यशस्वी लोक ज्यावेळी कोणत्या अनिश्चिततेमध्ये (uncertainity) असतात अशा वेळी शंका कुशंका मध्ये अडकण्याआधीच हे लोक कृती करून पुढे सरकलेले असतात. तेनी रॉबिन्स नावाचा तत्ववेत्ता खूप छान पणे सांगतो ‘ तुमचं यश ह्यावर अवलंबून आहे कि तुम्ही किती प्रमाणात अनिश्चितता समर्थपणे हाताळू शकता!’ आणि हेच मी कितीतरी यशस्वी लोकांबरोबर बघितल आहे. हे यशस्वी लोक लगेच निर्णय घेऊन पुढे निघतात आणि नंतर विचार करतात कि हि खरोखर चांगली आयडिया आहे कि नाही, कारण त्यांना हे माहिती आहे कि वेळ किती महत्वाची आहे. ते कृती करण्यात दिरंगाई करत नाहीत त्यांना हे माहित आहे कि जर ते अयशस्वी झाले तर ते यातून शिकून घेतात.

 

३) तुम्ही तुमच्या वेळेला किती महत्व देता (How much you value your time):

quote-and-value-of-life-and-time

जर तुम्ही त्या पैकी आहेत कि प्रत्येक घटकेला तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीचा दिशेने काम करत राहता. तुम्ही तुमचा एक सेकंड देखील जर वाया घालवत नसाल अस जर असेल तर हे तुमच्या यशस्वी होण्याचे धोतक आहे.

यशस्वी लोक त्यांच्या वेळेला खूप महत्व देतात. ते त्याच्या वेळापत्रकाला खूप कठोरपने  पाळतात. यशस्वी लोक social मीडिया (फेसबुक etc) वर वेळ घालवत नाहीत, हे लोक नेट वर अनावश्यक विडिओ बघण्यात वेळ घालवत नाहीत किंवा फालतू बातम्या बघण्यात त्यांना रस नसतो.

ते गुंतलेले असतात त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यात. त्यांची सकाळ आणि संध्याकाळ अत्यंत व्यस्त असते. सहसा, ते लवकर झोपी जातात आणि सकाळी लवकर ४.३० ला उठून आपल्या कार्यात मग्न होतात. ते दिवसाला १८ तास काम करत असतात. प्रचंड मेहनत, शक्ती आणि एकाग्रता फक्त स्वप्नसत्यात उतरवण्यासाठी.  मित्रानो लक्ष्यात घ्या , एक साधारण माणूस आपल्या ८ तास -९ तासाच्या कामा बद्दल तक्रार करत असतो. तर इकडे हे यशस्वी लोक जे आपल्या कामावर अत्यंत प्रेम करत असतात त्यामुळे ते १८ तास काम करून देखील आनंदी असतात.

तर मित्रानो, आता तुम्हीच ठरवा ह्या पैकी किती गोष्टी तुमच्या अंगी आहेत, आणि नसतील तर काळजी नको! उठा आणि कामाला लागा ! 

तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. तुम्ही तुमच्या comments द्वारे आम्हाला ते कळवू शकता किंवा Facebook वर Like आणि share करू शकता!!

तुम्हाला देखील अशी माहिती/लेख share करायची असेल तर संपर्क साधा!! तुमचा लेख प्रसिद्ध करायला आम्हाला नक्कीच आनंद होईल !!

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *